भूगोल इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्या त्या प्रकरणाचा सर्वांगीण व सुबोध असा 'गोषवारा' दिला आहे. तो वाचून प्रकरणाचा आशय व त्यातील महत्त्वाच्या भौगोलिक संकल्पना यांचे आकलन होणे विद्यार्थ्यांना सुलभ होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी प्रश्न, लघूत्तरी प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न आदी सर्व प्रकारच्या अपेक्षित प्रश्नांचा त्यांच्या मुद्देसूद, अचूक आणि आदर्श उत्तरांसह समावेश करण्यात आला आहे. तसेच, उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे प्रमाणबद्ध, सुबक व सोप्या आकृत्यांचा व नकाशांचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी या प्रश्नपत्रिका खचितच उपयुक्त ठरतील.