हजार लोकांची सभा आठ दहा जण उधळून लावू शकतात. खरे म्हणजे जमलेल्या लोकांचा नुसत्या हुंकाराने हे गर्भगळीत होऊ शकतात पण ते तसे करीत नाही म्हणूनच यांचे फावते. पगारवाढ आणि सवलती करता जागृत असण्याऱ्या संघटना, संस्थेतील गैरकारभाराबद्दल मौन बाळगून असतात. कोणी एकट्याने याविरोधात आवाज उठविल्यास त्याला गप्प करण्यात येते. गप्प झालाच नाही तर त्यालाच आरोपी ठरविण्यात येते आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठविण्यात येते. दुर्जन व्यक्ती फार बुद्धिमान असतात असे काही नसते. सज्जन माणसे चाकोरी बाहेर वागत नाहीत, असंघटित असतात याचा गैरफायदा दुर्जनांना मिळतो एवढेच. अशाच व्यवस्थेचा एक बळी, नरेन. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात. नरेनने या संधीचा पूर्ण फायदा घेतला पण ते तेवढे सोपे नव्हते. ही वास्तवाशी जवळिक साधणारी, मनोरंजक आणि विषयांचे वैविध्य राखणारी कथा आहे.