Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ
विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.