राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.